चहा...

         <script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5142589674299444"

     crossorigin="anonymous"></script>


          जवळपास सगळ्या लोकांच्या दिवसाची सुरुवात गरमागरम वाफाळत्या चहाने होते हो ना.... आपल्या देशात चहा आणला ब्रिटिशांनी आणि तो इथलाच होऊन गेला... आपल्याकडे दार्जिलिंग, आसामचा चहा खूप प्रसिद्ध आहे..तो इतका प्रसिद्ध आहे की, आता  G२० शिखर परिषद दिल्ली येथे झाली त्यात आलेल्या जगभरातील पाहुण्यांना दिलेल्या भेटवस्तू मध्ये दार्जिलिंग चहा आणि निलगिरी लीफ टी चा समावेश होता.

                 दार्जिलिंग हा जगातील सर्वात मौल्यवान चहा आहे.त्यापप्रमाणे निलगिरी चहा हा दक्षिण भारतातील सर्वात भव्य पर्वतराजीतून येतो.म्हणजे भारतातील चहाची महती सगळ्या जगात प्रसिद्ध आहे.चहाचे प्रकार वेगळे मसाला चहा, ग्रीन टी, बासुंदी चहा,मलई चहा अगदी बिनादुधाचा कोरा चहा ... पण चहा हा लागतोच. 
                 कितीतरी लोकांचा दिवस चहाशिवाय सुरू होत नाही, पूर्वीच्या काळी लांबून आलेल्या पाहुण्यांना पाण्यासोबत गूळ शेंगदाणे दिले जायचे त्यांचा थकवा दूर व्हावा म्हणून..... आता घरोघरी पाहुणचारासाठी चहा दिला जातो.काही जणांना चहा अमृततुल्य वाटतो तर काहींना चहाचं अगदी व्यसन लागते.
                 

सकाळी गडबडीत जाताना खाल्लेली चहा पोळी, चहा बिस्कीट असू दे. रात्री अभ्यास करताना जागरणासाठी घेतलेला चहा असू दे.पावसाळ्यातला गरमागरम वाफाळता चहा भजी असू दे नाहीतर थंडीतला कुडकुडत घेतलेला चहा असूदे असा हा चहा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लहानपण देगा देवा...

आई..