लहानपण देगा देवा...

                               


   एक लहान मुलं कसं असतं? अगदी निष्पाप,आरश्यासारखं स्वच्छ मन, स्वच्छंदी स्वभाव.लहान मुलांसारख निरागस मन आणखी कुणाचं नसावं, याचं मला   भावलेलं उत्तम उदाहरण म्हणजे काही कारणास्तव मी रडले,तर   माझी मुलगी हमसून रडायला लागते. ती अगदी विचारतही नाही   की आई काय झालं?? आईच्या डोळ्यात पाणी तर तिच्याही.


लहान मुलांचं कुतुहल हा एक आणखी वेगळा विषय... किती प्रश्न पडतात त्यांना.. नवीन काहीतरी करुन बघण्याची,
ते शिकण्याची किती उत्सुकता असते त्यांना...सतत प्रश्न,सतत धडपड.लहान मुलांची ऊर्जा तर बघण्यासारखी असते.त्यांना फक्त म्हणलं की आपण खेळायला जाऊ म्हणजे त्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो.
            जेव्हा एखाद्या मुलाला आपण खाऊ देतो किंवा अचानक एखादं गिफ्ट देतो तो जो चेहऱ्यावर आनंद असतो तो तर खुप खास असतो.जेव्हा एखादं लहान मुल स्वतःच्या 
पायावर उभं राहून चालायला शिकतं तेव्हा ते कितीही लहान असलं तरी नुसतं इकडून तिकडून पळत सुटतं त्यात त्याला अमाप आनंद मिळतो.आजकाल लोकांचे हेवेदावे ,रूसवेफुगवे , जीवघेणी स्पर्धा बघितली की वाटते लहानपण देगा  देवा...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चहा...

आई..