आई..
जगातील सर्वात सुंदर नातं म्हणजे आई आणि बाळाचं
... आणि सर्वात मोठा आनंद म्हणजे आई होण्याचा आनंद.हा तोच क्षण असतो जेव्हा बाळ रडलं की आईला आनंद होतो. बाळ झाल्यावर ती अजून कणखर बनते.
आई आपल्या आयुष्यात आशा आणि सकारात्मक विचारांनसारखी असते.जी नेहमी मुलांच चांगल व्हावं म्हणून राबत असते.मुलाला कुठलंही यश मिळाले की तिचा आनंद बघण्यासारखा असतो.आई आपल्या मुलाला तळहाताच्या फोडासारखे जपत असते... जणू काही शिंपल्यातला मोतींच.
तिचा बाळावरचा राग म्हणजे अळवावरचं पाणी.