गणेश चतुर्थी विशेष
ज्या सणाची अख्खा महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत असतो तो म्हणजे गणेशोत्सव... लहानथोर, आबालवृद्ध सगळ्यांचा लाडका गणराया येत्या काही दिवसांत विराजमान होईल अगदी थाटाने.
बाजारपेठा सजून गेल्या आहेत ,बाप्पांच्या आगमनाच्या तयारीसाठी.ती लगबग, लहान मुलांची उत्सुकता, नैवेद्याची तयारी,आर्कषक न सगळ्यांपेक्षा वेगळी ठरणारी आरास कशी करायची याच विचारात पडलेली मंडळी, पुजेची तयारी, नैवेद्याचा थाट ही सगळी लगबग अगदी पाहण्याजोगी असते.त्यातून मिळणारा आनंद काही औरच असतो.