मिसळ..

                 


                     मिसळ आपल्या अगदी जिव्हाळ्याचा विषय... मिसळ जशी चमचमीत,कटाची ,झणझणीत तितकीच ती आवडती.... मिसळ आवडणार नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही.
तर आज 'मिसळ' हा विषय का आला याचे कारण म्हणजे मी काल खाल्लेली रविवारीची खास मिसळ, तुम्ही म्हणाल यात काय नवीन?  तर आम्ही राहतो कामानिमित्त महाराष्ट्राबाहेर....तर एखादा मराठी पदार्थ जर खायला मिळाला तर..असा आनंद होतो जसा माहेरी आलेल्या मुलीला होतो......

            कोल्हापूरची मिसळ तर तिच्या आगळ्यावेगळ्या मस्त मसालेदार चवीसाठी प्रसिद्ध आहेच..पण त्या त्या प्रांतानुसार मिसळीचे प्रकार बघायला मिळतात.पुणेरी मिसळ, खानदेशी मिसळ, नाशिकची मिसळ.

           मिसळ सर्व्ह करताना पण अगदी वेगळ्या पद्धतीने केली जाते.. मटकी..मग फरसाण...मग त्यावरती कट अशी ही भन्नाट डिश.. बाहेर लोकांना  वडापाव, पुरणपोळी, मोदक हे अस्सल मराठमोळे पदार्थ माहितच आहेत पण कित्येक जणांनी मिसळ खाल्लेली सुध्दा आहे.. मिसळ प्रेमी ंसाठी तर मोठया मोठया शहरात मिसळ महोत्सव सुध्दा आयोजित केला जातो. तर अशी ही तुमच्या आमच्या आवडीच्या मिसळीची महती..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लहानपण देगा देवा...

चहा...

आई..