टेलिव्हिजन आणि आपण...

             




  तुम्हाला तुमच्या लहानपणीचा किंवा टीव्ही जेव्हा नव्हता तो काळ आठवतो का? किती सुंदर दिवस होते ते.....

 सगळे एकत्र बसून गप्पा मारत बसायचे, उन्हाळ्यात तर आकाशातल्या  चांदण्या बघत निवांत थंड वाऱ्यात गच्चीवर किंवा अंगणात झोपायचे, रात्री उन्हाळ्यात सगळे एकत्र बसून गप्पा मारत जेवायचे, लहान मुलांना गोष्टी सांगत भरवले जायचं...

                   टीव्ही नव्हता तर शांत झोप लागायची रात्री.. मुलं एकाग्रतेने अभ्यास करायची.लोकं घरी आलेल्या लोकांशी आपुलकीने बोलत बसायची, पारावर गप्पा चालायच्या रात्री उशिरापर्यंत.. घरी एखादा पदार्थ बनला तर गप्पांची , पदार्थांची देवाणघेवाण व्हायची मग मात्र टीव्ही आला आणि सगळं चित्रच बदलून गेलं.

                आता असं चित्र दिसते की सकाळी सकाळी टीव्ही वरती मालिका म्हणजेच टीव्ही सिरीयल्स चालू असतात अगदी सकाळी सात वाजताच..एक एक एपिसोड तीन तीन वेळा पाहिला जातो पण टीव्ही काही बंद होत नाही.घरातले मोठे लोक लहान मुलांसमोर टीव्ही बघत असल्याने मुलाला सिरीयल्स चे डायलॉग अगदी तोंडपाठ असतात .. 

               संध्याकाळी सात वाजले की देवापुढे आरती लागायची, शुभं करोती , श्लोक म्हणायचे आवाज यायचे.. आता संध्याकाळी सात वाजले की रस्ते , गप्पांचा कट्टा सगळा ओस पडून सगळे टीव्ही समोर बसतात...तो टीव्ही रात्री किती वाजता बंद होईल मग त्याचं काही बंधन नाही.. या टीव्हीनेच इतकंच काय तर मोबाइल ने सुध्दा लोकांची शांत झोप , माणसाची आपुलकी , प्रेम इतकंच काय मुलांच बालपण,त्यांचा खोडकरपणा सुध्दा हिरावून घेतला.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लहानपण देगा देवा...

चहा...

आई..