चहा...
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5142589674299444" crossorigin="anonymous"></script> जवळपास सगळ्या लोकांच्या दिवसाची सुरुवात गरमागरम वाफाळत्या चहाने होते हो ना.... आपल्या देशात चहा आणला ब्रिटिशांनी आणि तो इथलाच होऊन गेला... आपल्याकडे दार्जिलिंग, आसामचा चहा खूप प्रसिद्ध आहे..तो इतका प्रसिद्ध आहे की, आता G२० शिखर परिषद दिल्ली येथे झाली त्यात आलेल्या जगभरातील पाहुण्यांना दिलेल्या भेटवस्तू मध्ये दार्जिलिंग चहा आणि निलगिरी लीफ टी चा समावेश होता. दार्जिलिंग हा जगातील सर्वात मौल्यवान चहा आहे.त्यापप्रमाणे निलगिरी चहा हा दक्षिण भारतातील सर्वात भव्य पर्वतराजीतून येतो.म्हणजे भारतातील चहाची महती सगळ्या जगात प्रसिद्ध आहे.चहाचे प्रकार वेगळे मसाला चहा, ग्रीन टी, बासुंदी चहा,मलई चहा अगदी बिनादुधाचा कोरा चहा ... पण चहा हा लागतोच. ...